गंगापुरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमीत्त अभिवादन

Foto
उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांना पुस्तक वाटप

गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील नागरिक, युवक व विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी गंगापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा व धर्मरक्षणाच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन केले.

तसेच उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगराध्यक्ष संजय जाधव उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह कार्यक्रमास शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.